* स्पंदने* माझिया वेड्या
मनाचे गीत तुम्हा सांगतो मी ही
नसे माझी कविता फक्त श्ब्दा
गुंफितो मी ताटव्यातील या
फुलांचा मज कळे ना गंध कुठ्ला
त्या वहीतील पाकळ्यांचा गंध
केवळ जाणतो मी हे तुझ्या
नयनांतले प्रश्न मजला गुढ
छळती काव्यात साध्या
उत्तराचा खेळ सोपा खेळतो मी
जेव्हा मलाही ना कळे की काय
मजला वाटते तेव्हा तुझ्या
शब्दामधे माझेच मीपण पाहितो
मी मागचे जुने देणे मी फेडिले
व्याजासवे आता नव्याने ही नवी
कविता स्वतःची छेडितो मी ते
जगाला जाणणारे लोक केवळ थोर
असती कोवळ्या या स्पंदनातूनी
हा स्वतःला शोधितो मी मी असे
जे सांगतो ते का तुम्हाला आवडे
काय तुमच्याही मनीचे गुज अलगद
स्पर्शितो मी
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
Saturday, October 9, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment