Saturday, October 9, 2010

छडा लागला रे : सुरेश शिरोडकर

वृत्त - भुजंगप्रयात तुझ्या
सोबतीचा नशा लागला रे असा
जीवनाचा लळा लागला रे मनी
आठवांचे पुसूनी उसासे
कुसुंबी फुलांचा मळा लागला रे
अता भावनांची तृषा लोपली रे
सुखाचा झरा हा निळा लागला रे
फिक्या काजळाची झळाळी कितीशी
अभा रक्तिमेचा टिळा लागला रे
तुझ्या बासुरीचा झणत्कार
होता अता भैरवीला गळा लागला रे
पदस्पर्श होता तुझा राघवा रे
शिळेला स्वयंचा छडा लागला रे
सुरेश >>>
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment