....................................... ...पण सुरूच आहे
रहदारी ! .......................................
रस्त्यावर मेली म्हातारी...
...पण सुरूच आहे रहदारी ! विचार
यावर किती किती हा.. मी बनेन
म्हणतो अविचारी ! मी जगात
माझ्या रमलेला... मज नको तुझी
दुनियादारी ! हृदयाची होते
मेंदूशी का आजकाल मारामारी ?
मज विसर पडू दे दुःखांचा ये,
बैस जरा तू शेजारी ! चिंधीत
जिण्याच्या या माझ्या ही तुझी
आठवण जरतारी ! काम कधी, तर
मद-मोह कधी तू हिंड मना
दारोदारी ! - प्रदीप कुलकर्णी
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/2388
Wednesday, October 20, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment