Wednesday, October 13, 2010

......चालले मी !!! : supriya.jadhav7

......चालले मी !!! . * सारेच बंध मागे
सोडीत चालले मी , बेड्या
मणा-मणांच्या तोडीत चालले मी ! *
वा-यास बंध कोठे ते वाहते
कसेही , त्या वादळी तडाख्या
झोडीत चालले मी ! * गाठू कशी
किनारा हे शीड फ़ाटलेले ,
लाटेसही अताशा फ़ोडीत चालले मी
! * का आज घोर लावी घडले उणे-दुणे
जे , त्याही विवंचनेला खोडीत
चालले मी ! * माझ्याच भावनांनी
वेदीवरी चढावे , ज्या घोर त्या
प्रथाही मोडीत चालले मी ! * आकाश
भार होई पंखास या तरीही , नाते
दहा दिशांशी जोडीत चालले मी ! *
-सुप्रिया (जोशी) जाधव.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment