त्यात आता श्रावणाची रात आहे
चांदण्याचा नूर ह्या डोळ्यात
माझ्या,
आज हाती चांदण्याचा हात आहे
येउनी ती बैसली माझ्या समोरी,
काय माझ्या मैफिलीची बात आहे!
छंद वेड्या राधिकेचा काय
सांगू,
झोपताना बासरी हातात आहे!
आज साऱ्या पाकळ्या ह्या
ध्वस्त कैश्या?
-काय माळ्यानेच केला घात आहे?
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/441
No comments:
Post a Comment