शुभंकरोती !!! . * या ओंजळी सुखाची
स्वप्ने विरुन गेली , हे
हुंदके - उसासे , गात्रे शिणून
गेली ! * आरिष्ट जीवघेणे वेढे
तना - मनाही , उम्मीद वाटलेली ती
ही थिजून गेली ! * का उंबरा
झिजावा त्या - त्याच आठवांनी ,
गाठीस जोडलेली सौख्ये विटून
गेली ! * मी लिंपल्या कितीदा
भेगाळल्या व्यथाही , या काळजा
तड्याची भीती चिणून गेली ! * मी
रेखिते अजूनी भाळावरी
टिळ्याला, संध्या शुभंकरोती
अश्रू विणून गेली !! * -सुप्रिया
(जोशी) जाधव.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/
Tuesday, October 12, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment