कोणी न आज येथे !!! . * अश्रूस भिक
नाही,शब्दास दाद येथे, संस्कार
गाडलेले,नीतीच खाक येथे ! *
थुंकीस झेलणारे एकेक लाळघोटे,
न्यायास वाव कोठे, सत्तेस माज
येथे ! * ते खेळ रावणाचे ठावेच
सान-थोरा, रामास का पुजावे,
सीतेस जाच येथे ! * सूर्यास
झाकण्याने लोपे कधी प्रभा का?
खोटीच का ठरावी आदर्श बात येथे
! * ही फ़ौज लंपटांची दाही दिशेस
वेढे, कोणावरी विसंबू , कोणी न
आज येथे ! * -सुप्रिया (जोशी)
जाधव.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/
Monday, October 18, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment