Monday, October 25, 2010

भेटतो जरी अता नेहमी हसून पण : शाम

भेटतो जरी अता नेहमी हसून पण..
ठेवलीत आसवे रोजची जपून पण!
पाजळून ज्योत मी लाविला दिवा
जरी राहतो तमात तो कोपरा चुकून
पण! स्वप्नं देउनी नवे रात्र
धीर दे मला रोजचा दिवस नवा
खायला टपून पण! का मला अता
पुन्हा 'तू कसा' विचारता? काळजी
बरी नव्हे एवढे लुटून पण! रे
जगा तुझे किती अजून कर्ज फेडणे
शेष राहिले कसे जिंदगी पिसून
पण?
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2392

No comments:

Post a Comment