Tuesday, October 26, 2010

टाकली मी कात आता!!! : supriya.jadhav7

टाकली मी कात आता!!! . जन्म गेले
सात आता, पेटणे ना वात आता!
दुश्मनीने पेटलेले, रक्त
सांगे जात आता! शब्द जैसे
ओरखाडे, आप्त कैसे?...घात आता!
डुंबणारी नाव माझी, ना सख्याचा
हात आता! स्वप्न सारी भंगलेली,
मिट्ट काळी रात आता! गोठलेल्या
जाणिवांनी, मोडले मी आत आता!
काजव्यांची साथ कोठे, मीच केली
मात आता! गांव मागे आठवांचा,
टाकली मी कात आता! -सुप्रिया
(जोशी) जाधव.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment