गोठून वेदनेच्या, गाठी सुकून
गेल्या हुंकार झेलताना, जखमा
दुखून गेल्या .. ते सांगतात
काही, आशा उडे नभाशी येथे
सरावलेल्या, वाटा चुकून
गेल्या .. तो सागरी किनारा, आहे
उनाड थोडा पाहून रंग त्याचा,
लाटा रुकून गेल्या .. नाहीच जान
त्यांना, विश्वास ना कुणाचा
त्या पोळल्यात ऐश्या, बर्फा
फुकून गेल्या. .. आकाश पेलताना,
आधार तो गळाला त्या उंच ताठ
माना, का रे झुकून गेल्या. ..
आम्हास ध्यास होता, त्या
धावत्या क्षणांचा दारात
लोळणार्या, संधी हुकून गेल्या
- रमेश ठोंबरे
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/
Monday, October 11, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment