फीतूर .... लाजणे फीतूर होते
आरशाला दूर होते .............!! श्वास
ओले पैंजणाचे बासरीचे सूर
होते ..............!! कंकणी जे स्पंदनी
ते मी मला काहूर होते .............!!
भाळता आभाळ भाळी चंचला मी चूर
होते ..............!! वाळले डोळ्यात
अश्रू काजळा आतूर होते ..............!!
गाजले ओठात नाही हारणे मंजूर
होते ................!! अंतरी तुझ्या
जळोनी मी नवा अंकूर होते
..............!! .....कविता वृत्त :मनोरमा
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
Monday, October 25, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment