~ जिंकेल वाद येथे ~ अश्रूंस भीक
नाही , शब्दात वाद येथे वाचा
जिवंत होता, बहिर्यास साद येथे
.. आता कुणा कळेना, हा खेळ
थांबला का ? डावात हारला जो,
त्यालाच दाद येथे. .. वाली कुणीच
नाही, आधारही मिळेना चोरी करून
जो तो, होतो अबाद येथे. .. जातो
हिमालयी मी, होतो अजाण साधू
जाणून वागणारे, होतात बाद येथे
.. माझे मला मिळेना, जे घेतले
उशाशी का शोधतो मनोरा, वेडाच
नाद येथे .. मी आठऊन आलो, इतिहास
वाचलेला स्मृती उजाड झाल्या,
नाहीच 'याद' येथे .. सारे जुळून
येता, माघार घेतली मी ठाऊक आज
आहे, जिंकेल वाद येथे .. - रमेश
ठोंबरे
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/
Saturday, October 9, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment