Wednesday, October 13, 2010

छेडू नवी तराणी !!!! : supriya.jadhav7

छेडू नवी तराणी !!!! . * जो तो पळून
जातो ऐकून ही कहाणी , भांबावले
अशी की डोळा खळे न पाणी ! * पैशास
मोल येथे नातीच नामधारी कोणास
काय बोलू जी ती इथे शहाणी ! *
देवास शोधते मी माझ्याच
भोवताली , गंधाळती कधी का हे
कोळसे सहाणी ! * येथे
भल्या-भल्यांचा ऐसा निकाल
लागे , राजाच रंक होई , दैवा
कुणी न जाणी ! * या झोपडीत
माझ्या कोणी नुरे उपाशी ,
त्यागून चंद्र-तारे ,
साधी-सुधी रहाणी ! * तत्वास
जागणारे वेडे ठरू तरीही ,
छाटून वेदनेला छेडू नवी तराणी
! * -सुप्रिया.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment