ही घडी दे !!! . * चांदण्याचा
दाहदायी ज्वर नको ! दे मिठी
दे.......! आर्ततेचा स्वर नको !! *
रोमरोमी स्पर्श चंदन-केवडा !
एक फ़ुंकर.......! मोतियांची सर नको
!! * धुंद तू ही , धुंद शेजी मोगरा !
श्वास हळवे......! बोलण्याची भर
नको !! * मीलनांती ना उरावी
भिन्नता !! एक रुपे..........! व्यर्थ
मादी-नर नको !! * ध्रुवतारी
स्थान सजणा स्पंदनी ! ही घडी
दे........! कोणताही 'वर' नको !! *
-सुप्रिया (जोशी) जाधव.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/2416
Friday, October 29, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment