यौवना !!! . * नागिणीसम चाल जी
थिजवून गेली ! यौवना प्रेमात
ती रिझवून गेली ! * नेत्र ऐसे
तीर जैसा रोखलेला , काळजाशी
खलबते शिजवून गेली ! * मीतभाषी
गौरकांता लाघवीशी ,
पौर्णिमेचे चांदणे भिनवून
गेली ! * बोलणे की सूर वेडे
भैरवीचे , कोकिळेची तान जी
रिझवून गेली ! * दामिनीचा दाह
ओठी सांडलेला , हाय ! त्या
तारांगणा विझवून गेली ! *
स्पंदनांना आर्जवे ती
धडकण्याची , आठवांची शेज का
भिजवून गेली ! * -सुप्रिया (जोशी)
जाधव.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/
Friday, October 29, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment