मला कशास भेटती ? तुझ्या खुणा
पुन्हा पुन्हा तुझ्या परीच
वागती ! तुझ्या खुणा पुन्हा
पुन्हा..... पुसू कश्या तुझ्या
स्मृती ? स्मरू तरी किती
पुन्हा? मला पुसून टाकती !
तुझ्या खुणा पुन्हा पुन्हा
जरी तुझ्या सवेच मी ! तुझ्याच
आसपास मी उगाच वाट पाहती !
तुझ्या खुणा पुन्हा पुन्हा.......
अजून चंद्र चांदण्या ! तुला
मलाच शोधती बनून स्वप्न जागती
! तुझ्या खुणा पुन्हा पुन्हा
जुना रदीफ़ काफिया ! मुशायरा
नवा पुन्हा तशा नवीन भेटती !
तुझ्या खुणा पुन्हा पुन्हा.......
जिवंत मी ! असा कसा? मरून संपलो
तरी ? अजून श्वास पाळती ! तुझ्या
खुणा पुन्हा पुन्हा........ मयुरेश
साने ........दि..१६-ओक्ट-10
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2393
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment