Tuesday, October 12, 2010

आत्म्यात नांदला हा !!! : supriya.jadhav7

आत्म्यात नांदला हा !!! . * आता
कुणा कळेना, का खेळ थांबला हा.....
श्वासास जोडण्याला आजन्म
भांडला हा !! * दु:खे अशी मिळावी,
काताळ पाझरावा.... अश्रूस वाट
देता रे मेघ पांगला हा ! * जेथे
उतार भेटे, धावे तिथेच पाणी....
रंगात रंगण्याचा रे धर्म
सांधला हा ! * पंखास ओढ भारी,
घेण्या कवेत सारे.... ध्येयास
गाठण्याचा व्यासंग चांगला हा !
* दाही दिशेस जाता, वाटा जुळोनि
आल्या.... लाटा उधाणणा-या, आनंद
सांडला हा ! * येथे सहा ॠतुंचे
हे सोहळे निराळे ... मूढास काय
ठावे का डाव मांडला हा ! * ना
शाश्वती उद्याची, येती युगे नि
जाती... सूर्यान ऊगण्याचा का
चंग बांधला हा ! * जे ठेविले
अनंते तैसेचि रे रहावे .... शोधी
'तया' कुठेशी, आत्म्यात
नांदला हा ! * -सुप्रिया (जोशी)
जाधव.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment