....सारे मला मिळाले !!! (गझल). . *
काही न मागताही सारे मला
मिळाले , केसात माळले मी , तारे
मला मिळाले ! * मोडून मांडला तू
मांडून मोडलाही , नेत्रात दोन
अश्रू खारे मला मिळाले ! *
वाटेतल्या फ़ुलांचे काटेच
बोचलेले , एकेक घांव ताजे कारे
मला मिळाले ? * गाठू कसा किनारा ,
लाटेस ओढ भारी , ते स्वैर
वाहणारे वारे मला मिळाले ! * मी
आजही भुकेली एका अलिंगनाची ,
मौनातले उसासे सारे मला
मिळाले ! * -सुप्रिया (जोशी) जाधव.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/2362
Saturday, October 9, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment