रात्र झाली फ़ार आता !!! . रात्र
झाली फ़ार आता ! तार किंवा मार
आता !! दु:ख माझे राजवर्खी,
सौख्य खाई खार आता !
भौतिकाच्या भोगवाटा, आकळेना
सार आता ! आस खोटी सावल्यांची,
ऊन वाटे वार आता ! डागल्या
तोफ़ाच ऐशा, गारदी ही गार आता !
वळकटीला बांधले रे, राहिलेले
चार आता !! -सुप्रिया (जोशी) जाधव.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/2413
Wednesday, October 27, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment