Tuesday, October 12, 2010

मनाला किती अन् कसे आवरावे? : शाम

मनाला किती अन् कसे आवरावे?
कधी मेघ होई कधी रानरावे..
घराला घराचे न उरलेच काही कसे
वादळाला अता घाबरावे? नसे आत
जागा नव्या वेदनांना तरी घाव
कोणी नव्याने करावे? रिते आज
सारे झरे आसवांचे कसे
लोचनांनी अता पाझरावे? नभाला
तसे रोज मी पांघरीतो कधी त्या
नभाने मला पांघरावे... जरा शांत
होता मनाचे किनारे तुझी याद
येता पुन्हा हादरावे... ( तुझ्या
यौवनाचे किती बारकावे कसे दोन
डोळ्यांनि ध्यानी धरावे? )
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2374

No comments:

Post a Comment