Friday, October 22, 2010

प्रेम-धून : शाम

गायिलो तुझीच ती प्रीय
प्रेमधून पण.. पाहिले न तू मला,
मी तुला दिसून पण! प्रेम मी
तुझ्यावरी उधळले दिव्यापरी
राहिला तमात तो कोपरा चुकून
पण! काल मैत्रिणीस तू ,"मी
कसा?"विचारले केवढी तमा तुला,
एवढे लुटून पण? कोरडा जरी अता
वाटलो तुला तरी ठेवलीत आसवे
रोजची जपून पण! पाहिली तुझ्यात
मी नितळ प्रेम भावना माझिया
मनीच का वासना टपून पण?
'शाम'लाजतो सये यायला
तुझ्यापुढे पाहिले तसे तुला
कैकदा लपून पण!
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment