आवेग दाटलेला !!! . * वाहून काल
गेला , राहून साचलेला ! वाही मढे
मनाचे , हा जीव वाचलेला !! * रंगात
रंगण्या त्या राधा बनून आले ,
का रे प्रतारणेचा तू रंग
फ़ासलेला ? * मागून प्रेम येथे
भेटे कधी कुणा का ? गाठून तू
विषाचा प्यालाच पाजलेला ! *
त्यागून मोह-माया मी चालले
तरीही , का व्यर्थ सूड घेई हा
बंध काचलेला ! * तोडूनही तुटेना
ही पोत मानभावी , मेल्याविणा
सुटेना हा पीळ जाचलेला ! * येईल
पावसाळा ही आस मोरपंखी ,
शब्दात मांडवेना आवेग
दाटलेला !! * -सुप्रिया (जोशी)
जाधव.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/2381
Thursday, October 14, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment