Saturday, October 9, 2010

पंथ माझा वेगळा !!! : supriya.jadhav7

पंथ माझा वेगळा !!! . * शिंपणे
वाटेत मोती छंद माझा वेगळा ,
केवडा ना मोगरा मी गंध माझा
वेगळा ! * सावळ्याची बासुरी ना ,
ना सखीची पैंजणे, दामिनी मी
चंचला रे संग माझा वेगळा ! *
सूर्य होता पश्चिमेचा दो
घडीचा खेळ का? लालिमा ती मी
नभाची ढंग माझा वेगळा ! * माउली
मी,मीच भार्या,रेणुका मी
चंडिका.... गुंतुनी गुंत्यात
सा-या अंत माझा वेगळा ! * ना खुदा
ना देव माझा मी कुणा ना पाहिले,
श्रूखंला तोडून सा-या पंथ माझा
वेगळा! * -सुप्रिया (जोशी) जाधव.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment