स्थान कोठे ??? (गझल). . *
झिंगलेल्या वास्तवाचे भान
कोठे ? कोडग्यासी वागण्याचे
ज्ञान कोठे ? * का ठरावा त्याग
मिथ्थ्या ऊर्मिलेचा,
कोंदणाला रे हि-याची शान कोठे ?
* गौण झाला 'एकनिष्ठा' शब्द
येथे, लावणीला अग्रणीचा मान
कोठे ? * भाज पोळी तापलेल्या या
तव्याने, बारमाही कोकिळेची
तान कोठे ? * झापडे ही ओढली मी आज
ऐसी, चालणा-या या मढ्यासी
'जान' कोठे ? * ऊत्तरेसी
शोभणारा धृवतारा, साधनेविण
अढळ ऐसे स्थान कोठे? * -सुप्रिया
(जोशी) जाधव.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/
Thursday, October 28, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment