Thursday, May 6, 2010

दिवस रिकाम्या डब्यासारखा... : प्रणव.प्रि.प्र

दिवस रिकाम्या डब्यासारखा
वाजत राही नुसता खडखड
क्षणाक्षणांचा होतो कचरा,
त्या कचर्‍याचे ओझे अवजड! तो
धिंगाणा घालत राही... मी मौनाने
देतो उत्तर… एकातांची रोज
रात्रभर चालू असते नुसती बडबड!
इथेच ठेवुन अस्तित्वाला
गेलास कोणत्या गावी तू? ऐकू
येतो श्वास तुझा... या
भिंतींतुन हृदयाची धडधड... एके
दिवशी हळूच कानी अनुभव मजला
सांगुन गेला- 'जगणे नसते इतके
सोपे... जगणे नसते तितके अवघड!'
पक्षी आले होते तेव्हा झाड
किती मोहरले होते! अता दचकते
रोज ऐकुनी स्वप्नी त्या
पंखांची फडफड वादळ आले निघून
गेले शांत सरोवर हलले नाही... पण
माशांना फक्त माहिती खोल आत
झालेली पडझड! वास्तव म्हणजे
प्रगल्भ स्त्री- जी पचवत जाते
सगळे, आणिक- स्वप्न असे जणु
बोलत राही वयात आली मुलगी
अल्लड! - प्रणव
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment