Monday, October 4, 2010

शब्द बेईमान झाले आज इतके काय सांगू? : विजय दि. पाटील

का सदा माझ्यापुढे ही संकटे 'आ'
वासलेली? काळ आहे माजला की
जिंदगी सोकावलेली? शब्द
बेईमान झाले आज इतके काय
सांगू? बोलता आलीच नाही गोष्ट
मनि आकारलेली मुक्त मी व्हावे
म्हणोनी आणला आवेश अंगी भान
आले पाहिली अन, पावले ही
बांधलेली भौतिकाचे भाट,
ज्यांना बोचला संसार माझा आज
संन्यासात त्यांची का मती मग
बाटलेली? 'विजय' मिळवू
षडरिपूंवर, वल्गना केली जरी मी
आस भोगाचीच आहे अंतरी
जोपासलेली........
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment