दैव !!! (गझल). . (गागालगा गागालगा
गागालगा गागालगा) * देवाविना
देवालयी का मी उगा घोटाळले,
गंधाविनाही त्या फ़ुलाच्या का
अशी गंधाळले ? * मूर्तीस
देव्हा-यात माझ्या आदरे
प्रस्थापिले , रे प्राक्तनाचे
घाव ताजे का तरी रक्ताळले ? *
मंदावलेल्या त्या दिव्याला
तेल तेही घातले , घोंगावणा-या
वादळासी का कुणी संभाळले ? *
तोही चिडीचा डाव होता की तुझा
तो नाद रे , नादान वेड्या त्या
क्षणांनी मीच का छंदाळले ? *
टाळून टाळीले जरी जे व्हायचे
ते जाहले , कंठासि आले प्राण
आता दैवही कंटाळले ! * -सुप्रिया
(जोशी) जाधव.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/
Saturday, October 9, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment