Monday, October 4, 2010

हळूहळू मी दुनियेच्या मागे : वैभव देशमुख

हळूहळू मी दुनियेच्या मागे
येइल हळूहळू दुनिया माझ्या
मागे येइल खुशाल जा तू
मेंदूच्या मागे मागे मी अपला
माझ्या ह्रदयामागे येइल नको
रडू इतके की बदनामी होइल कथा
कुणाची अश्रूंच्या मागे येइल
अल्लड होती प्रीत, निरागस दिस
होते म्हटली होती शाळेच्या
मागे येइल... तिला भेटण्याची
इच्छा बाकी आहे नंतर म्रुत्यो
मी तुझिया मागे येइल माणुस
जाइल पुढे अता जितका जितका
म्हणजे बघ तितका तितका मागे
येइल फरक किती पडणार खरे
सांगितल्याने ? फार फार तर
थोडासा मागे येइल - वैभव
देशमुख
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/2326

No comments:

Post a Comment