शून्य, भाकड प्रश्न माझा,
व्यर्थ त्याची उत्तरे
साधण्या जवळीक जाता, वाढती का
अंतरे? काल वैराची सुपारी, आज
मैत्रीचे हसू, वागणे या
जीवनाचे कोणते मानू खरे? कोण
तो? त्याच्या नि माझ्या
वेगळ्या होत्या दिशा, पाडली
त्याच्या स्मृतींनी काळजाला
का घरे? मूळ आवृत्ती जशी होती
तशी, कोरी, नवी! वाचता आली
कुणाला गूढ त्याची अक्षरे?
लाकडे ओली असो की चंदनी राहो
चिता, शेवटी या चौथर्यावर
फक्त उरते राख रे!
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/2356
Friday, October 8, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment