कोजागिरी !!!....(गझल) . * धुंदश्या
तारांगणाला तारकांचा नाज
होता , रिक्तमाझ्या ओंजळी या
चंद्र माझा आज होता ! *
साजणीच्या कंकणांचा साजणा मी
नादवेडा , मौनतेला
प्रियतमेच्या घुंगरांचा बाज
होता ! * जीवघेणा दाह ओठी ,
श्वास-दरवळ मोग-याचा ,
सांडलेल्या मौक्तिकांना
गारव्याचा साज होता ! *
चांदण्यांची शेज-सजवी झोंबरे
वारे गुलाबी , रंगिल्या
कोजागिरीच्या पौर्णिमेचा गाज
होता ! * सावल्यांना जाग होती ,
पाकळ्या जेव्हा गळाल्या ,
रेशमाच्या त्या मिठीचा
मखमली-अंदाज होता ! * का
स्फ़ुरावी ओढऐसी अर्धरात्री
चांदण्यांना ? झिंगलेल्या
मैफ़िलीला काजव्यांचा साज
होता ! * -सुप्रिया (जोशी) जाधव.
पुणे.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/
Saturday, October 9, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment