Tuesday, October 5, 2010

दे चार श्वास दे रे .. : शाम

दे चार श्वास दे रे अजुनी
जगायला येणार प्रीत आहे मजला
बघायला.. शृंगारुनी तरीही
येतील लोक ते लागेल वेळ थोडा
त्यांना निघायला.. म्हणतील कैक
वेळा "होता भला!",मला जे पेटवून
मजला निघतील जायला.. समजू नको
खरी ही सारीच आसवे रडती कुणी
उगाही नजरेत यायला.. ओसंडतील
कोणी ह्रदयातुनी इथे क्षण चार
दे तयांचे डोळे पुसायला.. मग
हळहळून माझे करतील सोहळे
लागेल मी जगाला जेव्हा
कळायला..
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment