~ काही न मागताही ... ~ काही न
मागताही सारे मला मिळाले,
प्रेमात पोळते, निखारे मला
मिळाले ! * मोडून खेळ सारा तू
जिंकिले जगाला हारून
वेदनांचे तारे मला मिळाले ! *
वाटेतल्या फुलांनी नाही
विचार केला, काटेच पेरलेले,
शहारे मला मिळाले. * भटकेल तो
किनारा, मी आज गाठलेला जर
स्वैर वाहणारे वारे मला
मिळाले ! * मी आज तृप्त होतो, एका
अलिंगनाने, मैत्रीत ते फुकाचे,
नारे मला मिळाले ? * - रमेश
ठोंबरे
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/
Monday, October 4, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment