Saturday, October 2, 2010

उठ बा रे पांडुरंगा.. : शाम

संत नाही राहिले ते, राहिले ना
भाट आता उठ बा रे पांडुरंगा
दाखवाया वाट आता .. पेरल्या
नोटेस त्यांच्या पीक येते
बहुमतांचे लोकशाहीचा असा
बाजार हा सरलाट आता.. सांगतो हा
सातबारा आत्महत्येची कहाणी
कर्जमाफीचाच त्याहुन वाढला
बोभाट आता.. वाटतो जो
मुक्तहस्ते राज्य त्याचे, तोच
राजा तू तुझ्या कोट्यातलेही
रोज थोडे वाट आता..
चंद्रभागेनेच ज्यांची आजवर
धुतलीत पापे तेच सारे पुन्य
आत्मे घाण करती घाट आता.. रोज
कानी त्याच वार्ता थडकती
दाहीदिशांनी भ्रष्टनाही कोण
येथे? प्रश्न पडतो दाट आता.. जो
इथे पेटून उठला तो पुन्हा
दिसलाच नाही उघडणारे तोंड
होते बंद बिनबोभाट आता.. ताज
अन् कन्याकुमारी
प्रीति,शांतीचीच रुपे दोन्ही
तिर्थांच्या मधे मग देश का
मोकाट आता?.. खेळ पुन्हा तोच
येथे मांडला दुर्योधनांनी
लाज अबलेचीच पुन्हा 'शाम' बघते
वाट आता..
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment