जो जो नमून आला मंदीर अन्
मशीदी या पावल्यात त्याला
मंदीर अन् मशीदी.. ते ओरडून
गेले"हिंसा न धर्म अमुचा"
मारून माणसाला मंदीर अन्
मशीदी.. याचाच धर्म मोठा,
त्याचाच धर्म मोठा हा वाद बास
झाला मंदीर अन् मशीदी.. या
भांडणात तुमच्या तुम्ही जळा
खुशीने रे जाळता कशाला मंदीर
अन् मशीदी.. कोणास राम प्यारा,
प्यारा कुणास अल्ला सांगा
कुणी बघितला मंदीर अन् मशीदी..
वाटेल त्या रितीने वाटेल
त्यास वंदा का देव वाटलेला
मंदीर अन् मशीदी..
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
Sunday, October 3, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment