शामकांती सांजवेळी, चांदणे
माळीत जावे शारदाच्या
यौवनाला, रे दिला टाळीत जावे ..
ना भरोसा चांदराती, भाळलेल्या
त्या क्षणांचा सज्जनांनी
सज्जनांचे, वायदे पाळीत जावे ..
चांद आहे साक्षीला, चांदणीही
लाजलेली, मग कश्याला भारलेले,
तारुण्य जाळीत जावे ? ..
पौर्णिमेला गर्व होतो,
गौरकांती यौवनाचा चांदव्याने
का अताशा, पौर्णिमा न्ह्याळीत
जावे ? .. यौवनेची साद येता,
पांघराया चांदणे ते
विझलेल्या काजव्यांनी,
मागच्या ओळीत जावे .. शाम आहे
शामकांती, रात आहे गौरवर्णी
शारदाच्या याच राती, स्नेह ते
ढाळीत जावे. .. - रमेश ठोंबरे
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/
Sunday, October 3, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment