Monday, October 4, 2010

हेलकावे : एकतारे

हेलकावे माझिया वेड्या मनाचे
हेलकावे हे खरे की ते खरे
कोणास ठावे आज तुजला आवडू मी
लागलो सांग भुताने अता कोठे
निघावे वाट ज्या क्षणाची
पाहिली आजवर का त्या क्षणाने
क्षणभरात जावे कोण तो रे
स्वप्न चोरुनी पहातो काय माझे
स्वप्नही माझे नसावे
नाटकातील एक छोटे स्वगत हे का
कवितेने तया अपुले म्हणावे
दुःख जेव्हा येते उराशी
सागराचे कवितेस तेव्हा मी
जरासे आठवावे तारकांनी वाट
मजला दाखविली आज मी सुर्यास
माझ्या दीपवावे
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment