देवुनी तुझे तुला निघायचे मला
वेगळे तुझ्याविना जगायचे मला..
रावणापरी तुझे कुकर्म पाहिले
चेहरे तुला किती?बघायचे मला..
झेप घ्यायचो पुन्हा पडायचोच
मी लोक आपलेच हे नडायचे मला..
बोललो जसे, तसेच वागलो तरी
'चांगला'कुणीच ना म्हणायचे
मला.. माणसेच माणसास जगवितात
ना? फत्तरास अन् तरी पुजायचे
मला?.. मैफलीत मी कसे रमायचे इथे
मी फकिर हिंडुनीच गायचे मला..
सांगतोय 'शाम', का लिहायची गझल
मरण झेलुनी इथे उरायचे मला..
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
Sunday, October 3, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment