भारतातील सद्य स्थितीवर
सुचलेल्या काही ऒळी सादर करीत
आहे (हा काव्य प्रकार ग़झल
नसल्यास कृ्पया निदर्शनास
आणून द्यावे) इथे कुणाच्या
भावना दुखावण्याचा उद्देश
नाही, तसे झाल्यास क्षमा असावी
चुकभूल घ्यावी द्यावी *राम *
हरवली माणूसकी विरला सारा भाव
आहे उद्वीग्न होऊन अश्रू
गाळतो राम आहे बांधुनी भगवी
कफ़नी हे पुरती हिरवे झेंडे
पाढा तय़ांच्या पापांचा वाचतो
राम आहे बाप-भाऊ कुणाचा,
कुणाचा कुलदिपक आहे कबरीवरती
तयाच्या हुंदतो राम आहे
श्वापदांचा खेळ सारा जो-तो
पिसाळला आहे माणसात माणसाला
शोधतो राम आहे जिथे मशिदीत राम
आणि मंदिरात रहिम आहे
सोनियाचा दिवस असा मागतो राम
आहे ….हरिकीशन चं. बंडबे
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://www.sureshbhat.in/node/
Thursday, October 7, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment