कळेना !!! .....(गझल). . * नभी सांजवेळी
हि लाली कळेना ! कशी काय जादू ग
झाली कळेना !! * तुझे गीत
माझ्याच ओठी स्फ़ुरावे , कधी
लावल्या त्यास चाली कळेना ! *
शराबी शराबी निशा धुंदलेली ,
कशी चांदण्या जाग आली कळेना ! *
गुलाबी गुलाबी मिठी माळलेली ,
कसे जाम झाले ग खाली कळेना ! *
स्मरेना स्मरेना असे काय झाले
, फ़िरे स्वर्ग का भोवताली
कळेना ! * -सुप्रिया (जोशी) जाधव.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/
Saturday, October 9, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment