सानिका मी......(गझल) ... * . (विरहीणी
राधा न रहावून कॄष्ण भेटीस
द्वारकेत येते... मावळत्या
सूर्याच्या साक्षीने कॄष्ण
राधेचा शेवटचा निरोप घेवून
पाठमोरा झप-झप निघून जातो...
तेव्हा तिच्या मनात दाटून
आलेल्या भावभावनांचा
कल्लोळ.....) * सानिका मी , राधिका
मी पाश सारे तोडले रे ,
सावळ्याच्या सावलीशी दॄढ
नाते जो्डले रे ! * गुंगलेली ,
दंगलेली , बावरी त्या बासुरीची
, सूरवेडी मंत्रमुग्धा बंध
सारे मो्डले रे ! * रंगली रंगात
ऐसी श्यामवेडी गौरकाया ,
लाजरीशी प्रेमिका मी ओढणीसी
ओढले रे ! * श्यामहारी ,
कॄष्णहारी , मोहना तू
सौख्यकारी , ध्यास तोची
श्रीहरीचा नाम दूजे खो्डले रे
! * साठवोनी पाठमोरा गोकुळीचा
श्रीमुरारी , दाटल्या कंठासवे
त्या द्वारकेसी सोडले रे ! *
-सुप्रिया (जोशी) जाधव.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/
Saturday, October 9, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment