Saturday, October 9, 2010

...ते-ते तसे गाळीत गेले !!! (गझल). : supriya.jadhav7

...ते-ते तसे गाळीत गेले !!! (गझल). . *
जाळणा-य़ा जाणिवांना आज मी
जाळीत गेले ! जिंकण्याचे कायदे
ते हाय मी पाळीत गेले ! *
झिंगलेल्य़ा मॆफ़िलींचे दु:ख मी
कोळून प्याले, साजणा रे मी
सुखालाहि-चव-या ढाळीत गेले ! *
पेटल्या त्या ग्रीष्मदाही
शिंपुनी प्रेमास न्हाले,
चांदण्यांचे कोष केशी रे
सख्या माळीत गेले ! *
प्राक्तनाने फ़ॆसल्याशी गाठ
ऎशी पाडलेली, फ़ास मोहांचे
झणीरे मी असे टाळीत गेले ! *
भोगिलेल्या त्या व्यथांची
कात ती टाकून झाली, वाटले जे-जे
उणे ते-ते तसे गाळीत गेले ! *
-सुप्रिया (जोशी) जाधव.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment