Saturday, October 9, 2010

दर्पणी न्याहाळणे नाही !!!.........(गझल). : supriya.jadhav7

दर्पणी न्याहाळणे नाही
!!!.........(गझल). . (गालगागा लगागागा
लगागागा) * तीच ती वाट पुन्हा
चालणे नाही, भूतकाळी अता
रेंगाळणे नाही ! * गांव तो
आठवांचा राहिला मागे, आज त्या
आठवांना चाळणे नाही ! * वादळे
सोसली, ना वाकली फ़ांदी लाजरी
वेल ती संभाळणे नाही ! * रात
गेली सुनी नाही ग चंद्र्मा,
रातराणी सुगंधी माळणे नाही ! *
कुंकवाचा टिळा भाळी ग
ल्यालेला भंगल्या दर्पणी
न्याहाळणे नाही ! * -सुप्रिया
(जोशी) जाधव.
'सुरेशभट.इन'वरील दुवा:
http://sureshbhat.in/node/

No comments:

Post a Comment